केंद्रीय आश्रम शाळा

• शासन निर्णय :-
1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्‍ विभा्ग क्र.सीएएस2009/प्र.क्र.84/मावक-4 दि.26 जुलै 2010
2. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्‍ विभा्ग क्र.बीसीएच-2018/प्र.क्र.61/ शिक्षण -2 दि.08 मार्च 2019

• उद्दिष्ट:
केंद्रशासनाकडुन अनुदान मिळणा-या व स्वंयसेवी संस्थामार्फत अनुसुचित जातीच्या मुलां-मुलींकरीता चालविल्या जाणा-या तसेच तपासणी अहवालानुसार “अ” व “ब” श्रेणी प्राप्त्‍ व सदर तपासणीस असहकार दर्शवलेल्या अशा एकुण 165 आश्रम शाळांसाठी शाहु,फुले, आंबेडकर निवासी शाळा योजना या नावाने राज्य्‍ शासनाची नवीन योजना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासुन अंमलात आणण्यात आली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही. अशा मुला- मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणुन शासनाने केंद्रीय निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. निवासी शाळेत मोफत भोजन , निवास , ग्रंथालयीन सुविधा व इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

• संपर्क:
1. संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
2. संबंधित मुख्याध्यापक, शासकीय निवासी शाळा
3. संबंधित जिल्ह्याचे गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती
4. संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) , जिल्हा परिषद
5. संबधित विभागाचे प्रादेशिक उप्पायुक्त सामाज कल्याण• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २०१९

माहिती दर्शविणारा तक्ताऑनलाईन योजना