अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मान्यवर व्यक्तींचे स्मारक बांधणे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे

• शासन निर्णय :-
शासन निर्णय क्र:बीसीएच -2014/प्र.क्र.61/ बांधकामे दि. 16 डिसेंबर 2015.
शासन निर्णय क्र:स्वसेअं-2018/प्र.क्र.06/ बांधकामे दि. 27 फेब्रुवारी 2018.
शासन निर्णय क्र:बीसीएच -2014 प्र.क्र.61/ बांधकामे दि.05 नोव्हेंबर 2020.

• उद्दिष्ट:
अनुसुचीत घटकातील मान्यवर व्यक्तींचे स्मारक बांधणे तसेच अनुसूचित जातीच्या सांस्कृतिक व नीती मुल्यांवर आधारित विकास साधना-या प्रकल्पासाठी स्वयंसेवी संस्थाना अनुदान मंजूर करणे .

• लाभाचे स्वरूप अनुसूचित जाती व नवबौद्ध (महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील बौद्ध धर्मांतरीत) घटकातील मान्यवर व्यक्तींचे स्मारक बांधणे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे त्याचप्रमाणे सांस्कृतीक व नितीमुल्यांवर आधरित विकास साधना-या प्रकल्पांसाठी स्वयंसेवी संस्थाना अनुदान उपलब्ध करून देणे.
१)प्रकल्पाची मंजूर किंमत रु 2.00 कोटी किवा त्यापेक्षा कमी असल्यास निधी वितरणाची संपूर्ण कार्यवाही सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी करावी.प्रकल्पाची किंमत रु 2.00 कोटी पेक्षा जास्त असल्यास विहित टप्प्यावरील प्रकल्पाचा मुल्यांकन दाखला सहायक आयुक्त ,समाज कल्याण यांनी प्रादेशिक उपयुक्त समाज काल्यान यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करावा व त्यास प्रादेशिक उपायुक्त यांची मंजुरी झाल्यानंतर निधी वितरणाची कार्यवाही करावी.
२) पहिला हप्ता अंदाजे 25% :- कार्यारंभ आदेश दिल्यानंतर संबंधित बांधकाम कंत्राटदाराणे कामास सुरुवात करून प्रकल्प किंमतीच्या अंदाजे 25% किमती पर्यंतचे काम पूर्ण करावे. तसेच स्वयंसेवी संस्थेच्या 10% हिश्यापैकी 5% रक्कमेचे काम कंत्राटदाराने पूर्ण करावे.
3) दुसरा हप्ता अंदाजे 25% :- कंत्राटदाराने पुढील बांधकाम चालू ठेवून प्रकल्प किंमतीच्या अंदाजे 55% इतक्या किंमतीचे बांधकाम पूर्ण करून सदर बांधकामाचा मुल्यांकन दाखला संबंधित बांधकाम यंत्रणेच्या समक्ष प्रधिका–या कडून प्राप्त करून सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या कडे सादर करावा.
4) तिसरा हप्ता 25% :- बांधकाम कंत्राटदाराने पुढील बांधकाम चालू करून प्रकल्प किंमतीच्या अंदाजे 80% इतक्या किंमतीच्या बांधकाम पूर्ण करावे तसेच संस्थेच्या उर्वरित हिश्याचे 5% किंमतीचेही पूर्ण करावे व झालेल्या बांधकामाचे अंदाजे 85% खर्चाचा मुल्यांकन अहवाल बांधकाम यात्रणेच्या समक्ष सादर करावा.
5)चौथा हप्ता (अंतिम हप्ता) :- बांधकाम कंत्राटदाराने प्रकल्पाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करून प्रकल्पाचा 100%खर्चाचा मुल्यांकन दाखला तसेच प्रकल्प पूर्णत्व दाखला बांधकाम यात्रनेच्या समक्ष प्राधिक-याकडून प्राप्त करून सहायक आयुक्तसमाज कल्याण, नांदेड यांना सादर करावा.


• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २०२०

अर्जाचा नमुना

अधिक माहिती दर्शविणारा तक्ता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मौजे खराबखंडगाव ता.मुखेड जि.नांदेड गॅलरी


महात्मा जोतीबा फुले यांचे स्मारक मौजे होकर्णा तांडा ता.मुखेड जि.नांदेड गॅलरी

ऑनलाईन योजना