छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

• शासन निर्णय :-
1) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.11 जून 2003
2) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.8 जुलै 2003
3) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.21 जुलै 2003

• उद्दिष्ट:
इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविना-या अनु.जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात.

• पुरस्काराचे स्वरूप

1 सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास अनु.जाती, रु. 2.50 लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
2 सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्डमधून प्रथम आलेल्या अनु.जाती ,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास रु.1.00 लाख रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
3 सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादी मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास रु.50  हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
4 सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यात प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास रु.25  हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
5 सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास रु.10  हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
6 सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयता 10 व 12 मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास रु.5 हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र


• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २००३

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

राजर्षी शाहूमहाराज गुणवत्ता पुरस्कार योजना माहिती दर्शविणारा तक्ता

ऑनलाईन योजना