भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना

• शासन निर्णय :-
शासन निर्णय क्र. दवसू – 2015/प्र.क्र. 347/अजाक/दिनांक 09 मार्च 2018

• लाभाचे स्वरूप
1 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील अनुसुचीत जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी सदर योजना शासन निर्णय क्र. दवसु 2015/प्र. क्र. 347/ अजाक मंत्रालय मुंबई दिनांक. 09 मार्च 2018 अन्वये सन 2018-19 या आर्थिक वर्षापासून योजना सुरु करण्यात आलेली आहे.
2 मा. लोकप्रतीनिधिनी सुचविलेली कामे संबंधित लोकप्रतिनिधी ज्या कार्यालयीन यंत्रणेकडून कार्यान्वित करावयाची आहेत त्या कार्यान्वित यंत्रणेचे नाव तसेच यंत्रणेची तत्वत: मंजुरी अंदाजित किमतीच्या कामांचे सविस्तर नकाशे व अंदाजपत्रके संबंधितानी सादर केल्यानुसार मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.
3 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील वस्ती सुधार योजनेतंर्गत निधी प्राप्त होऊनही पुरेशा निधीअभावी गावातील/वस्त्यांमध्ये विकास कामे पुरेशा प्रमाणात झालेली नाहीत अशा भागातील लोकप्रतिनिधीना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रामविकास, अल्पसंख्याक आणि नगर विकास विभागाच्या धर्तीवर शासन स्तरावरुन थेट निधी उपलब्ध करुन देण्याची राज्यस्तर योजना आहे.
4 या योजने करीत लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विद्यमान खासदार व आमदार यांच्याच प्रस्तावाचा विचार होईल

• योजनेतंर्गत घ्यावयाची कामे
1 सदर योजनेतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीतील/ गावातील आणि पुरवठा, मलनि:सारण, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, गटार बांधणे, स्मशान भूमीचा विकास करणे, पथदिवे, पर्जन्य पाण्याची निचरा, सार्वजनिक सुलभ शौचालये, ग्रंथालय/ अभ्यासिका, व्यायाम शाळा या व्यतिरिक्त स्थानिक वस्तीतील रहिवाशांच्या गरजा लक्षात घेता विकास कामांना समावेश शासन स्तरावरुन करण्यात येईल.

• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २०१८
* शासन निर्णय १२ नोव्हेंबर २०१८
* शासन निर्णय ६ मार्च २०१९
* शासन निर्णय १६ ऑगस्ट २०१९
* शासन निर्णय ६ सप्टेंबर २०१९
* शासन निर्णय २६ मार्च २०२०
* शासन निर्णय ३१ मार्च २०२०
* शासन निर्णय २९ ऑक्टोबर २०२०

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

माहिती दर्शविणारा तक्ता

ऑनलाईन योजना