वृध्दाश्रम योजना

• शासन निर्णय :-
1. शासन निर्णय क्रमांक :- एसडब्लू-1062/44945/एन दिनांक 20 फेब्रुवारी 1963
2. शासन निर्णय क्रमांक विभशा- 2011/प्र.क्र.-6/विजाभज-2/दिनांक 29 डिसेंबर 2011

• उद्दिष्ट:
वृद्धपकाळ चांगल्या प्रकारे व सुखसमाधानाने घालविता यावा या करिता योजना सुरु करण्यात आली.

• लाभाचे स्वरूप
1. शासन मान्यता प्राप्त स्वंयसेवी संस्था मार्फत अनुदान तत्वावर वृद्धाश्रम चालविण्याची योजना सन 1963 पासून कार्यान्वित आहे.
2. संस्था हि संस्था नोंदणी अधिनियम, 1960 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, 1850 अंतर्गत नोंदणीकृत असावी.
3. सदर वृद्धाश्रमात अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, करमणूक, मनोरंजनाची सोय मोफत करण्यात येते.
4. वृद्धाश्रमात निराधार व निराश्रीत 60 वर्ष वरील पुरुष व 55 वर्ष वरील स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो.
5. प्रत्यक वृद्धामागे परिपोषण अनुदान 1 जानेवारी 2012 पासून प्रतिमाह रु. 630/ ऐवजी रु. 1500/- या प्रमाणे देण्यात येते.
6. वृद्धाश्रमाची प्रवेश संख्या कमीत कमी 25 आहे तसेच प्रत्यक वृद्धामागे इमारत बांधकाम अनुदान रु. 750/- एकदाच दिला जाते.

• संपर्क
(शहरीसाठी) 1. संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
(ग्रामीणसाठी) 2. संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकार जि.प.
3. संध्याछाया वृद्धाश्रम , गजानन महाराज मंदिर जवळ, मालेगाव रोड , नांदेड. 9921597660

मागील वर्षाची माहिती दर्शविणारा तक्ता

संध्याछाया वृद्धाश्रम , गजानन महाराज मंदिर जवळ, मालेगाव रोड , नांदेड. 9921597660
ऑनलाईन योजना