अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवकांसाठी सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

• शासन निर्णय :-
1. शासन निर्णय क्रमांक ईबीसी-2005/प्र.क्र 78/मावक-2, दिनांक
2. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2019/प्र.क्र 04/विजाभज-1, दिनांक
सामाजिक न्याय,सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय, क्रमांक ईबीसी-2005/प्र.क्र78/मावक-2,दिनांक 08.02.2006

• उद्दिष्ट:
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवाकांमध्ये सैन्य व पोलीसे भरतीपूर्व प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे, ते सक्षम असून सुद्धा त्यांना योग्य ती संधी मिळत नाही त्यामुळे त्यांना सैन्य व पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.

• अटी व शर्ती
1. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती/ नवबौद्ध घटकातील असावा.
2. उमेदवार 18 ते 25 वर्ष या वयोगटातील असावा.
3. उमेदवाराची उंची छाती इत्यादी सैन्य व पोलीसे भरतीसाठी विहित केलेली शारीरिक पात्रता असावी.
4. इयत्ता 12 वि पास असावा.
5. शारीरिक दृष्ट्या निरोगी असावा.
6. प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिन्याचा राहील.

• लाभाचे स्वरूप
या योजनेंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिन्याचा राहील 3 महिन्याच्या कालावधीत उमेदवारांच्या राहण्याची सोय प्रशिक्षण संस्थे मार्फत करण्यात येईल. प्रशिक्षण कालावधीत धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, पूल अप्स, ऑप्टिकल्स,रस्सी चढणे इ. विषयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल.

• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २००६

अर्जाचा नमुना

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

माहिती दर्शविणारा तक्ता

ऑनलाईन योजना