छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

• शासन निर्णय :-
1) इबीसी-2003/प्र.क्र.115 /मावक-2 ,दि.11 जून 2003
2) इबीसी-2003/प्र.क्र.204/मावक-3,दि.25 जुलै 2003

• उद्दिष्ट:
1. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी,तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये टिकून राहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हि योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजना इयत्ता 10 मध्ये 75% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या व इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये प्रवेश घेणा-या (अनुसूचित जातीच्या) मुला-मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.

2. अनुसूचित जाती, विजाभज/विमाप्र मुला व मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे.
3. शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावे.
4. अनुसूचित जाती, विजाभज/विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे.
5. पारदर्शकता, एकसूत्रात व विलंब टाळण्यासाठी ई-स्कॉलरशिप योजना.

• अटी व शर्ती
1. विद्यार्थी / विद्यार्थिनी इयत्ता 10 वी च्या वार्षिक परीक्षेत 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
2. विद्यार्थी शासनमान्य शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असावा.
3 .इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास सदरील योजना अनुशेय राहील.
4. उत्पन्नाची अट नाही.
5. ई-स्कॉलरशिप योजनेनुसार विद्यार्थी,शैक्षणिक संस्था व जिल्हा कार्यालय यांनी संगणकीय प्रक्रीये नुसार कार्य करणे अनिवार्य आहे.

• लाभाचे स्वरूप :
प्रती विद्यार्थी प्रती महा रु.300/- प्रमाणे 10 महिन्यासाठी रु.3000/- अनुशेय रक्कम शिष्यवृत्ती च्या स्वरुपात दिली जाते.

• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २००३

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

राजर्षी शाहूमहाराज गुणवत्ता पुरस्कार योजना माहिती दर्शविणारा तक्ता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणेआवश्यक आहे.

ऑनलाईन योजना