रमाई आवास घरकुल योजना
• शासन निर्णय :-
१. शासन निर्णय क्रमांक- बीसीएच-2008/प्र.क्र.36/मावक-२ दिनांक 15 नोव्हेंबर 2008
२. शासन निर्णय क्रमांक बीसीएच-2009/प्र.क्र.159/मावक-२ दिनांक 9 मार्च 2010
३. शासन पूरक पत्र क्रमांक- बीसीएच-2009/प्र.क्र.159/मावक-२ दिनांक 29 सप्टेंबर 2011
४. शासन ज्ञापन सान्याविसवि/क्र.रआयो-2014 प्र.10 /बांधकामे दि. 18 जुलै 2014
५. ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ईआयो 2015 प्र.क्र.200 योजना 10 दिनांक 30.12.2015
६. शासन निर्णय क्रमांक रआयो -2015 /प्र.क्र.420/बांधकामे, दि. 31.12.2015
७. शासन निर्णय क्रमांक रआयो -2015 /प्र.क्र.85/बांधकामे, दि. 15.3.2016
८. शासन निर्णय क्रमांक रआयो -2016 /प्र.क्र.578/बांधकामे, दि. 04.1.2017
• उद्दिष्ट:
अनुसूचित जाती नवबौध्द कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्याचे निवाऱ्याचा प्रशन सुटावा म्हणून ग्रामिण व शहरी भागामध्ये त्याच्या स्वत:च्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना सन 2009-10 पासून सुरु आहे. सदर योजनेची अमलबाजवणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा शहरी विभागासाठी नगर परिषद / नगर पालिका / महानगरपालिका या स्थानिक यंत्रणा मार्फत करण्यात येते.
• अटी व शर्ती
1. लाभार्थी महाराष्ट् राज्यामध्ये 15 वर्षाचे वास्तव असणे आवश्यक आहे.
2. एक कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.
3. लाभार्थ्यांने इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
• लाभाचे स्वरूप
1. घराच्या बांधकामासाठी क्षेत्र निहाय कलाम खार्चाची मर्यादा 1,32,000/- व नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी 1,42,000/- व नगर परिषद / नगर पालिका व महानगर पालिका व मुंबई विकास प्राधिकारण क्षेत्र यांच्या साठी रु. 2.50 लक्ष इतकी आहे.
2.लाभार्थी हिस्सा ग्रामिण क्षेत्रा करीत निरंक, नगर पालिका क्षेत्रा करीत 7.5 टक्के , महानगर पालिका क्षेत्रा करीत 10 टक्के इतका आवश्यक
3.शहरी विभागात दारिद्र्य रेषे वरील पात्र लाभार्थ्यांना सुध्दा घरकुल योजनेचा लाभ देण्यात येते.
सदर लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षीक उपन्न मर्यादा व लाभार्थी स्वहिस्सा अनुदानाच्या स्वरुपात खालील प्रमाणे
क्षेत्र |
उत्पन्न मर्यादा |
लाभार्थी हिस्सा |
नगरपालिका / महानगर पालिका |
रु. 3.00 लाख |
7.5 टक्के |
महानगर पालिका |
10 टक्के |
ग्रामिण |
रु. 1.20 लाख |
निरंक |
महानगरपालिका प्राधिकरण क्षेत्र |
रु. 2.00 लाख |
- |
4. ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक 30.12.2015 अन्वये पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना सुरु करण्यात आली असून सदर योजनेतंर्गत रमाई आवास योजनेतील ग्रामिण क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील घरकुलासाठी पात्र असणाऱ्या परंतू जागा उलब्धत नसणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जागा खरेदी करिता रु. 50000/- पर्यंत अर्थसहाय्य देण्यता येते .
5. अनुसूचित जातींमधील जे अपंग लाभार्थी दारिद्रय रेषेखाली नाहीत, ज्याचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा अधिक आहे व वार्षीक उत्पन्न 1 लाखा पर्यंत व त्या पेक्षा कमी आहे अशा अपंग लाभार्थ्यांना, ते योजनेच्या उर्वरीत अटी व शर्तीची पूर्तता करित असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
• शासन निर्णय डाऊनलोड करा
*
शासन निर्णय २०१७
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
माहिती दर्शविणारा तक्ता