भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास योजना
• शासन निर्णय :-
1. शासन निर्णय क्र. विघयो-102000/1592/प्र.क्र.189/नवि-4 दिनांक 05 मार्च 2005
2. शासन निर्णय क्र. :- सान्यावि-2015/प्र.क्र.163/बांधकामे कक्ष क्र. 140 दिनांक 09 ऑक्टोंबर 2015
3. शासन निर्णय क्र. दवसु 2016/प्र. क्र.156/अजाक मंत्रालय मुंबई दि. 12 ऑगस्ट 2016
4. शासन निर्णय क्र. :- दवसू 2016/पर.क्र.227/अजाक दिनांक 26 ऑगस्ट 2016
5. शासन निर्णय क्र. :- दवसू 2016/पर.क्र.304/अजाक दिनांक 23 जून 2017
• लाभाचे स्वरूप
सन 2015-16 हे वर्ष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्ष होते व सदरील वर्ष शासनाने “समता व सामाजिक न्याय” वर्ष म्हणून साजरे करायचा निर्णय घेतला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यासाठी सदर योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
• अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींची गावे निवडीचे निकष
1. या योजनेतंर्गत 125 निवडक गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांची निवड करण्यात यावी.
2. यामध्ये अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या गावांचा/वस्तीचा समावेश करण्यात यावा.
3. ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभुत सोयी-सुविधांचा अभाव आहे अशा वस्त्यांचा प्राधान्याने विचार करावा.
4. सदर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील नागरी सुविधांची कामे शासनाच्या प्रचलित कार्यपध्दती अवलंबून व नियमाप्रमाणे करावीत.
• अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास योजनेअंतगर्त घ्यावयाचे विविध उपक्रम
1. पाणीपुरवठा, मलनिसारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, गटारे बांधणी, विजपुरवठा, विद्युत पथ दिवे/ सोलर दिवे, सार्वजनिक विहीर खोदाई व दुरुस्ती इत्यादी.
2. समाज मंदिर बांधकाम, जुने समाज मंदिर असेल तर त्यांची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करणे.
3. समाज मंदिरामध्ये वाचनालय, संगणक केंद्र (इंटरनेटसह), व्यवसाय प्रशिक्षण शाळा, व्यायामशाळा (सर्व साहित्यसह) व छोटे सुसज्ज सभागृह असावे.
4. अंगणवाडी, बालवाडी यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
5. स्मशानभूमीत अद्यावत सोयी सुविधा तयार करण्यात याव्यात.
6. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत प्रत्यक घराला विज कनेक्शन,पाणी, नळ योजनेची जोडणी इ. सुविधांचा आढावा घेऊन करावी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त निवडक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास करणेबाबतचा मौजे कासराळी, ता. बिलोली जि. नांदेड या गावाची निवड करण्यात आलेली आहे. त्या नुसार सदरील गावात खालीलप्रमाणे कामे घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
अ.क्र |
कामाचे नांव |
अंदाजपत्रकाची रक्कम |
1 |
मौजे कासराळी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती समाजमंदिर बांधकाम करणे |
2,91,00,000 |
2 |
मौजे कासराळी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तील बालकांसाठी अंगणवाडीचे बांधकाम करणे |
2,50,00,000 |
3 |
मौजे कासराळी येथे अनु.जाती सदस्यांसाठी स्मशानभुमी बांधकाम करणे |
93,11,000 |
4 |
मौजे कासराळी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे |
1,41,35,000 |
5 |
मौजे कासराळी येथे अनु.जाती सदस्यासाठी स्मशानभुमी संरक्षण भिंत बांधणे |
10,55,000 |
|
एकूण |
7,86,01,000 |
• शासन निर्णय डाऊनलोड करा
*
शासन निर्णय २००५
*
शासन निर्णय २०१५
*
शासन निर्णय २०१६