सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
• शासन निर्णय :-
1) इबीसी-1077/26254/डेस्क-5 दि.1 ऑगस्ट 1978
2) इबीसी-2003/प्र.क्र.184/मावक-2,दि.17 सप्टेंबर 2003
3) इबीसी-1074/56423/डेस्क-5 दि.06 ऑगस्ट 1976
• उद्दिष्ट:
1.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा,सैन्यदलात भरती होण्याचे आकर्षण विद्यार्थीदशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी हि योजना लागू करण्यात आली आहे.
2. अनु.जाती, विजाभज व विमाप्र वर्गाच्या विद्यार्थ्याना सैनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
3 .सैनिक प्रशिक्षण घेवून पोलीस व सैन्य भरतीत नोकरीची संधी उपलब्ध करून देणे.
4. विद्यार्थ्याना शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
• अटी व शर्ती
1. विद्यार्थी 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात प्रवेशित असावा.
2.विद्यार्थी मागासवर्गीय अथवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावा.
3.पालकाचे वार्षिक उत्पन्न भारत सरकार शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती करीता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार ( वार्षिक उत्त्पन रु1,00,000/-च्या मर्यादेत ) असावे.
4. विद्यार्थी हा विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
5. प्रवेशित हा शासन मान्य अनुदानित/शासकीय/विनाअनुदानित संस्थेत शिक्षण घेत असला पाहिजे.
• लाभाचे स्वरूप
1.नाशिक,पुणे,सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याची शिक्षण फी,परीक्षा फी,भोजन,निवास,कपडे,घोडेस्वारी,पोकेट मनी इत्यादीवर होणा-या संपूर्ण खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते.
2.इतर मान्यता प्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी रु. 15,000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.
माहिती दर्शविणारा तक्ता