नांदेड जिल्हयाची संक्षिप्त माहिती

• मराठवाडयातील महत्वाचा जिल्हा नांदेड असून सदर जिल्हयात एकूण 16 तालूके आहेत. औरंगाबाद नंतर मराठवाडयात नांदेड जिल्हा मोठा आहे. सदर जिल्हयाची एकूण लोकसंख्या 3361292 असून अनु.जातीची लोक संख्या 2011 च्या जनगननेनुसार 640483 एवढी आहे.
• नंदीतट या शब्दापासून नांदेड या नांवाची उत्पत्ती झाली आहे.
• नांदेड येथे जग प्रसिध्द गुरुद्वारा असून शिखाचे दहावे व शेवटचे गुरु श्री गोंविंद सिंग यांच्या पवित्र समाधीमुळे हुजूर साहिब नांदेड म्हणून ओळखले जाते.
• नांदेड जिल्हयात देवीच्या साडेतीन शक्ती पिठापैकी एक जागृत स्थळ रेणुकामातेचे मंदिर 13 व्या शतकात यादवकालीन राजाने बांधले आहे.
• नांदेड पासून 57 कि.मी. अंतरावर लोहा तालुक्यात भगवान खंडोबाचे मंदिर आहे. माळेगांव यात्रा मार्गशिर्ष् महिन्यात आयोजन केले जाते, तसेच मराठवाडयातील ही मोठी पशुबाजार पेठ असून यासाठी प्रसिध्द आहे. माळेगांव हे गांव नांदेड- लातूर या हल रसत्यावर वसलेले आहे.
• नांदेड जिल्हयातील देगलूर तालुक्यात चालुक्य कालीन हेमाडपंथी मंदीर असून दर वर्षी होटटल महोत्सव जिल्हा प्रशासना तर्फे घेण्यात येतो.
• किनवट तालुक्यात उनकेश्वर मंदीर असून येथे सल्फर व फॉस्पेट युक्त पाणी यामुळे गरम पाण्याचे झरे आढळतात.
• नांदेड जिल्हयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असून सदर विद्यापीठाअंतर्गत 389 महाविद्यालये संलग्न आहेत.
• नांदेड जिल्हयास संस्कृत कवीचे शहर म्हटले जाते तसेच मराठी कवी विष्णुपंथ , श्री. रघुनाथ व श्री. वामनपंडीत यांचा जन्म व कार्यस्थळ नांदेड आहे .
• नांदेड शहरात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प विष्णुपूरी धरण आहे, जे गोदावरी नदीवर बांधले आहे.
• नांदेड जिल्हयातील अर्धापूर या तालुक्यात महाविहार बावरी नगर, दाभड येथे अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे दर वर्षी पौष पौर्णिमेला आयोजन करण्यात येते. तसेच महाविहार बावरी नगर, दाभड या ठिकाणास ऐतिहासिक तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे.




नांदेड जिल्ह्याचा नकाशा डाऊनलोड करा

ऑनलाईन योजना